Skip to main content

Marathi blogs on life:- आत्मविश्वासाने कसे जगावे! ....(Marathi blogspot)

Marathi Blogs on life:- आत्मविश्वासाने कसे जगावे! ....(Marathi blogspot)



नमस्कार, तुमच्या सर्वांचे Marathi Blog मध्ये स्वागत आहे. आज आपण या पोस्ट (post) मध्ये आत्मविश्वासाने कसे जगावेया बदल सांगण्याचा एक लहानसा प्रयत्न मी करणार आहे. चला तर मग सुरु करूयात. 



एका बादशहाने एकदा आपल्या वजिराला विचारले, "सर्वात श्रेष्ठ हत्यार कोणते ,सांग बरे ?" वजिराने उत्तर दिले, "आत्मविश्वास!"

बादशहाला ते काही पटेना. त्याने वजिराची परीक्षा पाहण्याचे ठरविले. काही दिवसांनी बादशहाने वजीर निःशस्त्र असताना त्याच्या अंगावर एक माजलेला हत्ती सोडण्यस सांगीतले.

वजिराने हत्ती येत असलेला पाहून रस्त्यावर झोपलेले एक मरतुकडे कुत्रे उचलले. त्याचे पाय गरागरा फिरवून त्याला हत्तीच्या अंगावर फेकून दिले. कुत्रे टॅहा ऽ टॅहा ऽ... करीत हत्तीच्या सोंडेवर आदळले. त्याचा पंजा व नखे हत्तीला बोचली. त्यामुळे हत्ती उलट्या दिशेने इतक्या जोरात पळाला की त्याच्यावरचा माहूतसुद्धा क्षणभर घाबरला. बादशहाला जेव्हा हे कळले तेव्हा त्याला वजिराच्या उत्तराची खात्री पटली. वजिराजवळ आत्मविश्वास नसता तर त्याला संकटाला साहसाने तोंड देताच आले नसते. आत्मविश्वासाच्या सामर्थ्यावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. इस्त्रायलच्या वीर डेव्हिड या तरुणाने पॅलेस्टाईनमधील भीमकाय योद्धा गोलिधन याला केवळ गलोलीतून दगड मारून पराभूत केले. त्याच्याजवळ दुसरे कोणतेही शस्त्र नव्हते. पण जे शस्त्रांचे शस्त्र आहे तो आत्मविश्वास होता. आत्मविश्वास जागृत झाला की मनुष्यातील सर्व सुप्तशक्ती जागृत होतात. "अशक्य हा शब्द फक्त मूर्ख लोकांच्या शब्दकोशात आढळतो." हे नेपोलियनचे उद्गार आत्मविश्वासाचेच द्योतक आहेत.


Marathi-blogs-on-life


आत्मविश्वास फार मोठी शक्ती आहे. तिच्या जोरावर असामान्य यश मिळविता येते. केवळ बंदुका लढत नसतात. तर त्यांच्या पाठीमागचे मराठी मन व मनगट लढत असते. आत्मविश्वास नसेल तर सर्व शारीरिक व मानसिक शक्ती निष्फल ठरतात. आत्मविश्वास हे कर्तृत्वाचे महान तत्व आहे. आत्मनिर्भरता, आत्मविश्वास व आत्मसन्मान या तीन गुणांचे संवर्धन म्हणजेच बलसंवर्धन होय!


     ज्याचा आत्मविश्वास संपला त्याचे सारे काही संपले. या देशाचा इतिहास म्हणजे मूठभर आत्मविश्वास असणाऱ्या लोकांचा इतिहास. तुमचा ३३ कोटी देवांवर विश्वास असेल, पण तुमचा तुमच्यावर विश्वास नसेल तर तुम्हाला कधीही मुक्ती मिळणार नाही. स्वामी विवेकानंद तरुणांना उद्देशून नेहमी असे आवाहन करीत व म्हणत, "शंभर आत्मविश्वासी तरुण मला मिळाले तर मी या देशाचा कायाकल्प घडवून आणेन." अलिबाबाच्या 'खुल जा सिमसिम' या शब्दाप्रमाणे आत्मविश्वास हा परवलीचा शब्द असून, तो आत्मोन्नीतीची गुहा उघडून उत्कर्ष, यश, नेतृत्व सन्मान यांचे रत्नभांडार आपल्यापुढे उभे करतो. [Marathi blog on life]

       कैलोनाच्या स्टीफनला शत्रूनी कैद केले. त्याला दरडावून विचारले, "कोठे आहे तुझा किल्ला व तुझे साथीदार?" स्टीफनने आपल्या हृदयावर हात ठेवला व तो म्हणाला. "हा पाहा माझा अजिंक्य किल्ला, त्यातच माझे आत्मविश्वासाचे, जिवास जीव देणारे सैनिक आहेत. हा किल्ला अजिंक्यच आहे. लाख प्रयत्न करूनही तो नाही हस्तगत करता येणार तुम्हाला!" आत्मविश्वास म्हणजे अहंकार किंवा पोकळ वल्गना नव्हे. आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरील अभंग विश्वास.

Marathi Blog on life: आत्मविश्वासाने कसे जगावे ? [Marathi blogspot]


     
समुद्रात एकदा भयंकर वादळ उठले. जहाज हेलकावे खाऊ लागले. सारे खलाशी घाबरून गेले. त्यांचा धीर सुटला. सीझर त्याच नौकेत होता. तो म्हणाला, "घाबरू नका. तुमच्या नौकेत सीझर व त्याचे भविष्य आहे आणि त्याचे भविष्य उज्ज्वल आहे!". याउलट आत्मविश्वासाच्या अभावी सर वॉल्टर रैले याने मोठ्या परिश्रमाने लिहिलेला जगाचा इतिहास जाळून टाकला. आत्मविश्वास हा अंतःकरणाचा हुंकार असतो, यशाचा ओंकार असतो. आपला आपल्या कामावरचा विश्वास व विश्वासाच्या मांगल्यावर निष्ठा यातून आत्मविश्वास निर्माण होतो. आत्मविश्वासाचा अभाव सामान्यतः तीन कारणांनी निर्माण होतो.

1) माहितीचा अभाव (Marathi  blog):- सध्याच्या विज्ञान युगात माहितीचा स्फोट होत आहे. नवीन नवीन तंत्रे उदयास येत आहेत. त्यांचा अभ्यास व अनुभव आत्मविश्वासासाठी अत्यावश्यक आहे.

२) मान्यता किंवा स्वीकृतीचा अभाव :- प्रत्येक माणसाला आपल्या प्रयत्नास कोणाची तरी शाबासकी हवी असते. दोन कौतुकाच्या शब्दांची गरज असते. प्रामाणिक स्तुती व स्नेहपूर्ण प्रोत्साहन याच्या जोरावर पालक, शिक्षक व समाज तरुणांमध्ये आत्मविश्वास जागृत करू शकतील. आपणच आपल्या कामगिरीचे यथार्थ मूल्यमापन करण्यास शिकलो, आपल्या उणिवा व आपले सामर्थ्य पाहू शकलो तर आत्मविश्वास व आंतरिक समाधान हे दोन पक्षी आपण एकाच झडपेत पकडू शकू, इतरांच्या मान्यतेची पण मग गरज उरत नाही.

३) अपरिचित वातावरण :- नवीन व्यक्ती नवीन परिस्थिती, नवीन जबाबदारी यांच्यामुळे आत्मविश्वास थोडा ढळणे हे स्वाभाविक आहे. हळूहळू ज्ञान प्राप्त करून घेणे हाच त्यावर उपाय आहे. भाषण करताना प्रथम भीती वाटते, पण सवयीने व सरावाने ती कमी होते. दोन शब्दही धड न बोलता येणारे कालांतराने पट्टीचे वक्ते बनतात.


^^Marathi blog:- Posts for Reading ^^

      आत्मविश्वासाची शक्ती मानसशास्त्रज्ञ किंवा संमोहनशास्त्रज्ञ किंवा अन्य कुणीही आपल्याला देत नाही. ती आपल्यात असतेच. सफलता आत्मविश्वास जागृतीमुळे मिळते. इतर बाबी निमित्तमात्र असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी अब्राहम लिंकन ३५ वेळा निवडणुकीत पराभूत झाले होते. पण त्यांचा आत्मविश्वास खचला नव्हता. 

     कोलंबस जेव्हा अमेरिका खंडाच्या शोधात निघाला तेव्हा त्याचे सर्व साथीदार कालांतराने परत फिरण्याविषयी बोलू लागले. कोलबसचा आत्मविश्वास मात्र डळमळला नाही. म्हणूनच तो इतिहासात अजरामर झाला.

Marathi-blogs-on-life


     बहुतेक लोकांना या शक्तीची जाणीव नसते. त्यामुळे ते जीवनात पुढे जाऊ शकत नाहीत. आत्मविश्वास म्हणजेच ईश्वरशक्तीचा स्त्रोत, आत्मविश्वास म्हणजेच प्रगतीची जननी. सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त, शंकराचार्य, ज्ञानेश्वर यांनी टीकेचे, निंदेचे छळाचे सर्व हलाहल पचविले व मानवजातीला कल्याणाचे अमृत दिले. ते सारे आत्मविश्वासाचे पुत्र होते. ६०० विद्यार्थ्याच्या एका पाहणीत विद्यार्थ्यांना त्यांची "सर्वात मोठी समस्या कोणती?" असा प्रश्न विचारला असता, ४५० विद्यार्थ्यांनी "आत्मविश्वासाचा अभाव" सांगितल्याचे आढळून आले. आपल्याला आपल्याबद्दल जे वाटते. इतर आपल्याला काय म्हणतील ते रागावतील, ते हसतील, नावे ठेवतील याचीच ती भीती असते. न्यूनगंड किंवा भयगंड हा आत्मविश्वासाला बाधक ठरतो. (Marathi blog on life)

    आत्मविश्वासासाठी आपण प्रथम स्वतःचा स्वीकार केला पाहिजे. हे आत्मप्रेम स्वार्थी नसावे किंवा निरर्थकही नसावे. आपल्या मित्राचे दोष माहिती असूनही आपण जसा त्याच्याबद्दल सहिष्णू दृष्टिकोन बाळगतो तसा स्वतःच स्वतः चा सन्मान ठेवला पाहिजे. आत्मनिरीक्षण किंवा आत्मशोध आत्मविश्वासाला प्रेरक व मार्गदर्शक ठरतो. सहभाग सहकार्य, परोपकार, प्रार्थना हे आत्मविश्वासाचे चार खांब आहेत. परिपूर्ण ज्ञान ज्ञानाचे उपयोजन, आत्मसंशोधन व यातून स्वाभाविकरीत्या स्वतःच्या श्रेष्ठतेबद्दल निर्माण होणारा विश्वास म्हणजे आत्मविश्वास!

"Traveller, there are no Paths Paths are made by walking"

आत्मविश्वास याच धर्तीवर सदा सिद्ध नसतो. तो आत्मसाधनेने जागृत करावा लागतो. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणत-  "उतिष्ठत ,जाग्रत ,प्राप्यवरान्निबोधत!"


    तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचल्या बदल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. ही पोस्ट आवडली असेल तर सर्वांना शेअर करा. मराठी भाषेतील knowledge घेत राहा, marathi blogs वाचत राहा. आमच्या blog ला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद!.















Comments

  1. उत्तम माहिती
    https://lyricsinmarathi22.blogspot.com/

    ReplyDelete
  2. खूपच चांगल्याप्रकारे समजावले आहे , खूप खूप धन्यवाद, मला पण support kra Latest posts

    Dr Thanks for sharing such a great article and it's helpful for everyone. Great Post!.. Latest posts

    ReplyDelete
  3. आत्मविश्वास खरचं खूप महत्त्वाचा असतो. खूप छान पद्धतीने आत्मविश्वासाबद्दल लिहिले आहे 👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान👌👌 जीवन जगताना आत्मविश्वास असणे खूप गरजेचे आणि महत्त्वाचे असते.

    ReplyDelete

Post a Comment