Marathi Blogs on Nature:- निसर्ग कोपतो तेंव्हा... (Marathi Blog)
निसर्ग (Nature) मानवाचा सखा आहे. निसर्गाचे रूप, सौंदर्य त्याची साथ मानवी भुरळ घालत असते. निसर्ग (Marathi blogs on nature) निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्या सहवासात मानव आपल्या व्यथा विसरतो. मन हलकं प्रफुल्लित करून घेतो. पण या निसर्गाचा कोप झाला तर एका सेकंदात त्याचे मोहक रूप दाहक बनते. क्षणात सारे काही विनाशा च्या खाईत लोटूले जाते. असे निसर्गाचे रौद्र रूप कधी महापूर तर कधी अवर्षण आणि कधी भूकंप दुष्काळ वीज पडणे तर कधी उल्का पृथ्वीवर पडणे या स्वरूपातून जेव्हा समोर येते तेंव्हा सर्व हृदयांचा थरकाप होतो. सृष्टीचे स्वरूप पालटते.
मुसळधार पावसात विजाचे नर्तन चालू होते. पावसाच्या धारा तीव्रतेने बरसत होत्या. सारी सृष्टी ओलीचिंब झाली होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. संध्याकाळ निशेच्या भेटीसाठी निघाली होती. बाबांबरोबर मी दिवसभर शेतातच होतो. रविवारची सुटी असल्याने शेतात येण्याचा हट्ट मी केला होता. संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही दोघे मोटारसायकलने घरी परतण्यासाठी निघालो. अचानक पाऊस सुरू झाला. पावसाने जोर घेतला. जवळच्या शेतातल्या एका घरात आम्ही आश्रय घेतला. थोड्याच वेळ ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट असा वाढला की, मी घाबरून बाबांच्या गळ्याला मिठी मारली. आम्ही खिडकीतून बाहेर पाहिले. दुरून दोन व्यक्तीही पळत घराकडे येताना दिसल्या. त्यांच्या पायांच्या गतीपेक्षा जास्त वेगाने पाऊस वाढला पाऊस व विजा यांना घाबरून दोघे जीव मुठीत घेऊन पळत होते. अन् क्षणात सारे संपले.... विजेचा एक लोळ आकाशातून त्यांच्या अंगावर कोसळला.. सारे संपते ...... त्यांच्या देहाची राख झाली. कोळसा झाला प्रचंड आवाज होऊन तो विजेचा लोळ खाली आला होता. हे सारे पाहून आमचे डोळे दगडासारखे थिजले.हृदय रक्ततबंबाळ झााले. निसर्गापुढे मानव किती थिटा आहे. याची जाणीव झाली. नकळत पापण्यां नकळत पापण्यांचे काठ सोडून अश्रूंच्या धारा ओघळल्या.
अग्नी ,पाणी यांची आवश्यकता आपणांस रोज असते. त्यांच्या भीषण रूपाने मात्र संहार होतो. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले. ओल्या वातावरणाला जाळणारी ही घटना मनाला चटके लावून गेली. मनाची राख करून गेली.
हल्ली रोजच किंवा बन्याचदा 'बीज अंगावर पडून मृत्यू' अशा बातम्या कानावर येतात. निसर्गाचा कोप कधी होईल कोण त्याचा बळी ठरेल. काही सांगता येत नाही.
शेक्सपिअर ने म्हटले आहे -
"निसर्ग हा सन्माननीय खलपुरुष आणि कु-साधुपुरुष आहे. कारण तो जसा दिसतो त्याच्या उलट असतो"
निसर्गाचे रौद्र रूप बघितले तर त्याचे रम्य रूप हे त्याचेच का? असा प्रश्न मनाला पडतो. निसर्ग आपल्यासमोर येतो. आनंद कधी तर कधी दुःख घेऊन..... मानवी जीवनही असेच आहे.
"शिवाजी सावंत' लिखित 'छावा' मध्ये त्यांच्या शब्दात "जीवनातील काही भाष्येच अशी असतात की त्यावर माणसाच्या वाणीचे भाष्य अपुरे ठरते" याचा प्रत्यय या घटनेने दिला होता. शब्दही न बोलू शकता त्या व्यक्ती कायमच्या गप्प झाल्या होत्या. या घटनेला आज बरीच वर्षे झाली. पण अजूनही ते सारे आठवले की अंगावर शहारे उभे राहतात. हृदय विदीर्ण होते.
तो दिवस... तो क्षण... ती सृष्टी.... तो विजेचा लोळ. .... ती राख झालेली शरीरे.... निसर्गाचं रौद्र रूप... भयानक टाहो.... सारं इतकं संहारक होऊ शकतं? या = आश्चर्यानं अजूनही माझी पाठ सोडलेली नाही. किल्लारीचा भूकंप असो की इतर महापूर, - अवर्षण याद्वारे निसर्गाचा कोप असो मानव मात्र विवश आहे. तो काहीच करू शकत नाही; फक्त प्रार्थनेशिवाय !
"पृथ्वीमाते, अशी पृथक होऊ नकोस जलदेवते, अशी रुसू नकोस अग्निदेवते अशी भडकू नकोस आम्ही तुझी बाळे आहोत!!"
तुम्ही ही पोस्ट शेवट पर्यंत वाचल्या बदल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. ही पोस्ट आवडलीअसेल तर सर्वांना शेअर करा. मराठी भाषेतील knowledge घेत राहा, marathi blogs वाचत राहा. आमच्या blog ला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद!.
खूपच छान sir👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिले आहे. खरचं प्रत्येकाने निसर्ग समजून घेतला पाहिजे .
ReplyDeleteअप्रतिम लिखाण वाचत असताना निसर्गाला मिठीच मारावी वाटत होती
ReplyDelete