Marathi Blogs on Nature:- निसर्ग कोपतो तेंव्हा... (Marathi Blog) निसर्ग (Nature) मानवाचा सखा आहे. निसर्गाचे रूप, सौंदर्य त्याची साथ मानवी भुरळ घालत असते. निसर्ग (Marathi blogs on nature) निसर्गाशी एकरूप होऊन त्याच्या सहवासात मानव आपल्या व्यथा विसरतो. मन हलकं प्रफुल्लित करून घेतो. पण या निसर्गाचा कोप झाला तर एका सेकंदात त्याचे मोहक रूप दाहक बनते. क्षणात सारे काही विनाशा च्या खाईत लोटूले जाते. असे निसर्गाचे रौद्र रूप कधी महापूर तर कधी अवर्षण आणि कधी भूकंप दुष्काळ वीज पडणे तर कधी उल्का पृथ्वीवर पडणे या स्वरूपातून जेव्हा समोर येते तेंव्हा सर्व हृदयांचा थरकाप होतो. सृष्टीचे स्वरूप पालटते. मुसळधार पावसात विजाचे नर्तन चालू होते. पावसाच्या धारा तीव्रतेने बरसत होत्या. सारी सृष्टी ओलीचिंब झाली होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. संध्याकाळ निशेच्या भेटीसाठी निघाली होती. बाबांबरोबर मी दिवसभर शेतातच होतो. रविवारची सुटी असल्याने शेतात येण्याचा हट्ट मी केला होता. संध्याकाळ झाल्यानंतर आम्ही दोघे मोटारसायकलने घरी परतण्यासाठी निघालो. अचानक पाऊस सुरू झाला. पावसाने जोर घेतल...
Marathi Blogs :- marathi Blogspot . मराठी Blogspot ब्लॉग - ( Total मराठी knowledge) Marathi Blogger.