Marathi blogs : वाचाल तर वाचाल ! - New Marathi Blogs भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की "वाचाल तर वाचाल!" इतर प्राण्यापेक्षा मनुष्यप्राण्याचा मेंदू अधिक तल्लख आहे. मनुष्य त्यामुळे बोलणे, लिहिणे वाचणे या क्रिया करू शकतो. वाचनाचे महत्व अफाट आहे. वाचनाने आपले व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. वाचनाने मनुष्य बहुश्रुत होतो. त्याचे ज्ञान वाढते. वेळ सकारणी लागतो, जगात काय चालले आहे याची जाणीव होते. वाचनाच छंद, चांगली पुस्तके संग्रहित करण्याचा छंद जडतो. करमणूक ही होते. सखोल वाचनाने विषय चांगला समजतो. मनाला प्रसन्नता मिळते. चांगला वाचक चांगला वक्ता ही बनू शकतो. वाचनातून भूतकाळ व वर्तमानकाळ दोन्हीही नजरेसमोर उभे राहू शकतात. आपले ज्ञान व प्रगती या दोहोंना द्विगुणीत करण्याचे कार्य वाचन करते, थोर नेत्यांची चरित्रे आपल्याला प्रेरणा देतात. मुद्रणकलेचा शोध हा एक सुंदर आविष्कार होय. वाचनाची अनमोल भेट त्याने आपल्याला दिलीय. त्यामुळे माणूस चितंनशील बनला. प्रगतीच्या वाटेवर अधिकाधिक वेगाने धावू लागला. शालेय पुस्तके, धार्मिक ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, काव्य, मराठी ब्लॉग ...
Marathi Blogs :- marathi Blogspot . मराठी Blogspot ब्लॉग - ( Total मराठी knowledge) Marathi Blogger.